Maharashtra

सहर शेख यांचं नगरसेवकपद धोक्यात? बोगस प्रमाणपत्र प्रकरणामुळे ठाण्यात खळबळ

सहर शेख यांचं नगरसेवकपद धोक्यात? बोगस प्रमाणपत्र प्रकरणामुळे ठाण्यात खळबळ

ठाणे | प्रतिनिधीMIM पक्षाच्या नगरसेविका सहर शेख यांच्या विरोधात बोगस प्रमाणपत्र वापरल्याचा गंभीर आरोप समोर आला असून, या प्रकरणाची अधिकृत चौकशी सुरू झाली आहे. संबंधित तक्रार दाखल झाल्यानंतर ठाणे तहसीलदार कार्यालयाने याची दखल घेत तपास प्रक्रिया हाती घेतली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सहर शेख यांनी निवडणुकीदरम्यान सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये कथित अनियमितता असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सर्व कागदपत्रांची पडताळणी सुरू केली आहे.
जर चौकशीदरम्यान आरोप सिद्ध झाले, तर सहर शेख यांचे नगरसेवकपद रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे ठाणे शहरातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान, या प्रकरणाबाबत सहर शेख यांची भूमिका अद्याप समोर आलेली नाही. पुढील चौकशी अहवालानंतरच या प्रकरणाचे खरे स्वरूप स्पष्ट होणार आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button