१८ वर्षीय गाउट गाउटने मोडला विक्रम; २०० मीटर शर्यतीत नवा इतिहास
१८ वर्षीय गाउट गाउटने मोडला विक्रम; २०० मीटर शर्यतीत नवा इतिहास
ऑस्ट्रेलिया : केवळ १८ वर्षांच्या वयात ऑस्ट्रेलियाच्या धावपटू गाऊट याने धावपट्टीवर नवा इतिहास रचला आहे. ऑस्ट्रेलियन अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये त्याने २०० मीटर शर्यत अवघ्या १९.६७ सेकंदांत पूर्ण करत विक्रमी कामगिरी नोंदवली.
ही वेळ २० वर्षांखालील गटातील जागतिक विक्रम मानली जात असून, यामुळे गाउट गाउटची तुलना आता महान धावपटू उसेनबोल्ट याच्याशी केली जात आहे. विशेष म्हणजे, बोल्टने २००४ च्या ऑलिम्पिकमध्ये २०० मीटर शर्यत १९.९३ सेकंदांत पूर्ण केली होती.
गाउट गाउटच्या या कामगिरीमुळे जागतिक अॅथलेटिक्स क्षेत्रात मोठी चर्चा रंगली असून, भविष्यात तो आणखी मोठे विक्रम प्रस्थापित करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर त्याने आज जागतिक स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे

