ई-केवायसीसाठी आमिषांना बळी पडू नका; महिलांना मंत्री अदिती तटकरे यांचे आवाहन
ई-केवायसीसाठी आमिषांना बळी पडू नका; महिलांना मंत्री अदिती तटकरे यांचे आवाहन
मुंबई : राज्य सरकारच्या “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेअंतर्गत ई-केवायसी प्रक्रियेच्या नावाखाली काही ठिकाणी महिलांची फसवणूक होत असल्याची बाब समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी महिलांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
मंत्री तटकरे म्हणाल्या की, ई-केवायसीसाठी कोणत्याही एजंट किंवा मध्यस्थांची आवश्यकता नाही. काही जण पैसे घेऊन ई-केवायसी करून देण्याचे आमिष दाखवत आहेत, मात्र महिलांनी अशा फसव्या प्रकारांना बळी पडू नये. ही प्रक्रिया अत्यंत सोपी असून महिलांनी ती स्वतःच्या मोबाईलवरून किंवा अंगणवाडी सेविकांच्या मदतीने पूर्ण करावी.
योजनेचा लाभ सुरळीत मिळावा यासाठी ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक असून, यासाठी शासनाने ३० एप्रिलपर्यंत मुदत दिली आहे. महिलांनी कोणालाही पैसे न देता अधिकृत मार्गानेच प्रक्रिया पूर्ण करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, संबंधित विभागानेही नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे
9822548429
