Maharashtra
लता मंगेशकर हॉस्पिटलचे नाव बदलणार; आशा भोसले यांच्या नावाचाही समावेश
लता मंगेशकर हॉस्पिटलचे नाव बदलणार; आशा भोसले यांच्या नावाचाही समावेश
पुणे : मंगेशकर कुटुंबीयांकडून उभारण्यात येणाऱ्या नव्या हॉस्पिटलच्या नावात महत्त्वाचा बदल करण्यात येणार असल्याची घोषणा हृदयनाथ मंगेशकर यांनी केली आहे. यापूर्वी या हॉस्पिटलचे नाव “लता मंगेशकर हॉस्पिटल” असे ठेवण्याचे नियोजन होते.
मात्र आता या नावात बदल करून महान गायिका लता मंगेशकर यांच्यासोबतच आशा भोसले यांच्या नावाचाही समावेश करण्यात येणार आहे. नव्या नावानुसार हे हॉस्पिटल “लता आशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस” म्हणून ओळखले जाईल.
हे हॉस्पिटल पुण्याजवळ उभारले जाणार आहे.
या प्रकल्पामुळे आरोग्यसेवेच्या क्षेत्रात मोठी भर पडणार असून, पुणे परिसरातील नागरिकांना आधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार आहेत.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे


