Maharashtra

दिनकर मिश्रा व सिद्धिविनायक संस्थानतर्फे आयोजित द्विदिवसीय श्रीरामचरितमानस सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न

दिनकर मिश्रा व सिद्धिविनायक संस्थानतर्फे आयोजित द्विदिवसीय श्रीरामचरितमानस सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न
शहरात भक्ती आणि संस्कृतीचा सुंदर संगम पाहायला मिळाला, दिनकरजी मिश्रा व सिद्धिविनायक संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित द्विदिवसीय श्रीरामचरितमानसावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला.
या भव्य कार्यक्रमात सुमारे ३ हजारांहून अधिक भाविकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. कार्यक्रमादरम्यान भजन, कीर्तन, प्रवचन तसेच श्रीरामचरितमानसाचे पारायण यामुळे परिसर भक्तिमय झाला होता.
या कार्यक्रमाला माननीय उपमहापौर सौ. बाबर, श्री भोईर साहेब तसेच श्री योगेश बेहल यांची प्रमुख उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत, समाजात धार्मिक व सांस्कृतिक जाणीव वाढविण्यासाठी अशा कार्यक्रमांची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी दिनकर मिश्रा व सिद्धिविनायक संस्थानच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे व कार्यकर्त्यांचे विशेष योगदान लाभले.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button