Maharashtra

सेलू तहसील कार्यालयात जन्म – मृत्यू शेत रस्ता संबंधित प्रकरणे गेल्या तीन वर्षापासून प्रलंबित आहेत:

सेलू तहसील कार्यालयात जन्म – मृत्यू शेत रस्ता संबंधित प्रकरणे गेल्या तीन वर्षापासून प्रलंबित आहेत:

जि. परभणी. ता. सेलू : दि. 13 एप्रिल 2026:
सेलू तहसील कार्यालयात गेल्या तीन वर्षापासून प्रलंबित असणारे प्रकरणी मार्गी लावण्यासाठी जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा राज्यमंत्री मेघना दिदी बोर्डीकर यांच्या मतदारसंघात शेत रस्ता व जन्म मृत्यू प्रकरणे प्रलंबित असल्यामुळे अनेक शेतकरी परेशानी आढळत आहेत तेथील सरकारी कर्मचारी व तहसीलदार त्यांना थारा देत नसल्याने त्यांनी पालकमंत्री मेघना दीदी साकोरे बोर्डीकर यांच्या कार्यालयात जाऊन तेथील तालुका अध्यक्ष गणेश रावजी काटकर यांच्याकडे जाऊन आपल्या मतदारसंघांमध्ये तहसील कार्यालयातून कोणतेही शेत रस्त्याचे काम व जन्म मृत्यू नोंद प्रमाणपत्र मिळत नसल्याने व शेत रस्त्याची आदेश पारित होऊन शेत रस्ता मोकळा होत नसल्याने त्यांच्याकडे तक्रार केली.

त्यांनी तहसीलदार यांना तात्काळ शेतकऱ्याचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावावे .असे तहसीलदार यांना सांगण्यात आली .शेत रस्त्याची प्रश्नतात्काळ मार्गी लावण्यात यावी अन्यथा पालकमंत्री यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात येईल असे सांगण्यात आले .

पत्रकार :विजय रणभोर, पुणे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button