महाराष्ट्रात २ लाखांपर्यंत शेतकरी कर्जमाफी; अर्थसंकल्पात मोठी घोषणा
महाराष्ट्रात २ लाखांपर्यंत शेतकरी कर्जमाफी; अर्थसंकल्पात मोठी घोषणा
मुंबई, ६ मार्च – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र सरकारने २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा जाहीर केला. राज्यातील शेतकऱ्यांच्या पीक कर्जांवर २ लाख रुपयांपर्यंत संपूर्ण कर्जमाफी देण्याची घोषणा करण्यात आली आहे.ही योजना ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेल्या पीक कर्जांसाठी लागू होईल. याचा थेट लाभ राज्यातील अंदाजे २५ लाख शेतकऱ्यांना मिळेल. अर्थसंकल्पात या योजनेसाठी १० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, सहकारी बँका आणि राष्ट्रीयकृत बँकांमधील थकीत कर्जांपैकी २ लाखांपर्यंतची रक्कम पूर्णपणे माफ केली जाईल.राज्यातील सुमारे ३५ हजार कोटी रुपयांच्या थकबाकीपैकी मोठा हिस्सा या योजनेने माफ होईल. तसेच, २०२० ते २०२५ दरम्यान नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून ५० हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येईल. यात लहान व मध्यम शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाईल.या घोषणेचे शेतकरी संघटनांनी स्वागत केले आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे


