Maharashtra

कोपरखैरणेतील विद्या भवन सोसायटीत स्लॅब कोसळला; 14 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, 12 विद्यार्थी व शिक्षिका बचावले

कोपरखैरणेतील विद्या भवन सोसायटीत स्लॅब कोसळला; 14 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, 12 विद्यार्थी व शिक्षिका बचावले

नवी मुंबई : कोपरखैरणे सेक्टर 2, प्लॉट क्रमांक 12 येथील विद्या भवन सोसायटीमध्ये गुरुवारी सायंकाळी सुमारे 5.20 वाजण्याच्या सुमारास धक्कादायक घटना घडली. तळमजल्यावर घरगुती क्लास सुरू असताना पहिल्या मजल्यावरील स्लॅब अचानक कोसळल्याने एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच वाशी, कोपरखैरणे आणि ऐरोली येथील अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाने तातडीने बचावकार्य सुरू करून मलब्याखाली अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढले.
या दुर्घटनेत एकूण 12 विद्यार्थी आणि 1 शिक्षिका अशा 13 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. यापैकी चार ते पाच विद्यार्थ्यांना प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र उपचारादरम्यान एका या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची माहिती वाशी महापालिका रुग्णालयाकडून देण्यात आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाकडून इमारतीच्या सुरक्षिततेची तपासणी सुरू करण्यात आली आहे.

प्रतिनिधी सिंथीया कोरिया

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button