जालना मर्चंट बँक घोटाळयामध्ये फिर्यादीच निघाले आरोपी
जालना मर्चंट बँक घोटाळयामध्ये फिर्यादीच निघाले आरोपी
बँकेचे महाव्यवस्थापक राजेंद्र टोकशा यांना अटक, आर्थिक गुन्हे शाखेची कामगीरी आरोपीस सोमवार पर्यंत पोलीस कोठडी मंजुर
जालना : (प्रतिनिधी महेंद्र बेराड)
जालना शहरातील जालना मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेची बनावट कागदपत्रांच्या आधारे वेअर हाऊस च्या नावे 177 बनावट खातेदारांच्या माध्यमातुन 23 कोटी 33 लाख रुपयांची फसवणूक केल्या बाबत तक्रार प्राप्त झाल्यावरुन चंदनझीरा पोलीस स्टेशन येथे नमूद प्रकरणात चंदनझीरा गु.र.नं. 220/2026 कलम 316(2), 318(4), 336(3), 338, 340(2), 61(2),3(5) BNS 2023 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर बँकेमध्ये अपहार झाल्याने व सदर अपहाराची रक्कम मोठ्या प्रमाणात असल्याने गुन्ह्याची व्याप्ती बघून मा. पोलीस अधीक्षक जालना यांनी सखोल तपास करण्या बाबतचे आदेश आर्थिक गुन्हे शाखेला दिलेले आहेत.
गुन्ह्याच्या तपासा दरम्यान गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार आरोपी नामे 1) रायचंद सखाराम कुरंगळ यास अटक केल्यानंतर त्याला मदत करणारे त्यांचे साथीदार आरोपी नामे 2) निलेश्वर शेषराव भोसले वय 46 वर्ष सिंदखेड राजा जि. बुलढाणा 3) रामेश्वर विलासराव जाधव 4) ज्ञानेश्वर विलासराव जाधव 5) सुधाकर रावसाहेब ठोंबरे यांना यापुर्वीच अटक केलेली आहे.
सदर गुन्हयाचे तपासामध्ये आरोपीकडे केलेल्या तपासात व बॅकेचे शाखाधिकारी यांचे कडे केलेल्या तपासात मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे व निष्पन्न तथ्या आधारे गुन्हयाचे फिर्यादी राजेंद्र भिकचंद टोकशा, वय 58 वर्षे, व्यवसाय नौकरी, बँक महाव्यवस्थापक (मोतीराम अग्रवाल जालना मर्चंट को. ऑ. बँक लि. जालना) रा. मोदीखाना जालना ता.जि. जालना याचा आरोपीचे कटामध्ये सहभाग असल्याचे दिसुन आल्याने तसे पुरावे पोलीसांना मिळाल्याने त्यास आज रोजी अटक करण्यात आली आहे. तर त्यांचे चौकशीमध्ये इतरही नावे समोर येण्याची शक्यता आहे.
गुन्हयातील दोन्ही मुख्य आरोपी रायचंद सखाराम कुंरगळ, निलेश्वर शेषराव भोसले, यांचे सह राजेंद्र भिकचंद टोकशा यांना सोमवार पर्यंत पी.सी.आर. मंजुर केली आरोपीतांकडे चौकशी चालु असुन इतर आरोपीतांची नावे निष्पन्न करुन त्यांचा शोध सुरू आहे.
सदर कामगीरी ही मा. श्री. अजयकुमार बन्सल पोलीस अधीक्षक जालना, श्री. आयुष नोपाणी अपर पोलीस अधीक्षक जालना, श्री.सुरेश उनवणे प्रभारी पोलीस उपअधीक्षक आर्थिक गुन्हे शाखा जालना, यांचे मार्गदर्शनाखाली श्री. मिथुन घुगे सहा. पोलीस निरीक्षक,शैलेश म्हस्के, पोलीस उप निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा जालना, आणि शाखेतील पोलीस अंमलदार गोकुळसींग कायटे, समाधान तेलंग्रे, किरण चव्हाण, अंबादास साबळे, गजू भोसले, विष्णु कोरडे, ज्ञानेश्वर खुने, रविंद्र गायकवाड, श्रेयस वाघमारे, चालक पाठक मेजर, महिला अंमलदार, जयश्री निकम, मंदा नाटकर यांनी पार पाडली.