अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशनात नामांकित अँकर्सचे मार्गदर्शन; विद्यार्थ्यांना नवी दिशा;
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशनात नामांकित अँकर्सचे मार्गदर्शन; विद्यार्थ्यांना नवी दिशा;
जि. लातूर. ता. (उदगीर):-दि. 20 एप्रिल 2026:-
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या ४४ व्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या निमित्ताने उदगीर येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाच्या परिसरात नामांकित टीव्ही अँकर्सचे आगमन झाले. या कार्यक्रमाला पत्रकार आणि विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती लाभली.
या वेळी News 18 मराठीचे विश्वजित परदेशी, ABP माझाचे प्रज्ञा पवार, TV9 मराठीच्या श्वेता डांडेकर, Zee 24 तासचे सौरभ कोरटकर तसेच लोकशाही न्यूजचे संपादक विश्वजित पाटील हे मान्यवर उपस्थित होते. मुक्तपीठचे संपादक तुषारदास भोईटे यांनीही कार्यक्रमात सहभाग नोंदवला.
या अँकर्सनी आपल्या अँकरिंग क्षेत्रातील प्रवास, सुरुवातीच्या अडचणी, तसेच मीडिया क्षेत्रातील विविध पैलूंवर सविस्तर मार्गदर्शन केले. प्रभावी संवादकौशल्य, आत्मविश्वास, तसेच सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
या मार्गदर्शन सत्रामुळे उपस्थित पत्रकार आणि विद्यार्थ्यांना मोलाची दिशा मिळाली असून, अँकरिंग व पत्रकारिता क्षेत्रात पुढे जाण्यासाठी नव्या प्रेरणेचा स्रोत ठरला.
पत्रकार : विजय रणभोर, पुणे.
