Maharashtra

कोल्हापुरात रंगणार संत ज्ञानेश्वरांच्या जीवनप्रवासाचा सोहळा; ‘मोगरा फुलला’ कार्यक्रमाचे आयोजन:-

कोल्हापुरात रंगणार संत ज्ञानेश्वरांच्या जीवनप्रवासाचा सोहळा; ‘मोगरा फुलला’ कार्यक्रमाचे आयोजन:-

कोल्हापूर : दि. 26 एप्रिल 2026:-
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रभर विविध सांस्कृतिक उपक्रमांची मांदियाळी सुरू आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून कोल्हापूरच्या रसिकांसाठी ‘मोगरा फुलला’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचा तपशील:

*दिनांक: सोमवार, २७ एप्रिल २०२६

*वेळ: सायंकाळी ६ वाजता

*स्थळ: गोविंदराव टेंबे सभागृह, देवळ क्लब, कोल्हापूर.

*प्रवेश विनामूल्य*

भक्ती आणि संगीताचा सुरेल संगम

“ज्ञानीयांचा राजा मोगरा फुलला” हा कार्यक्रम संत ज्ञानेश्वर महाराजांच्या अलौकिक जीवनचरित्रावर आधारित आहे. या कार्यक्रमात निरूपणकार गणेश शिंदे माऊलींच्या जीवनातील निवडक आणि प्रेरणादायी प्रसंग आपल्या ओघवत्या भाषेत उलगडून दाखवतील. या निरूपणाला सुप्रसिद्ध गायिका सन्मिता शिंदे यांच्या गायनाची साथ लाभणार असून, अभंग, भजन, गवळण आणि भारूड यांच्या माध्यमातून भक्तीचा मोगरा रसिकांच्या मनात दरवळणार आहे.

सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांनी कोल्हापूर परिसरातील सर्व रसिक श्रोत्यांना आणि भाविकांना या सांगीतिक मेजवानीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून, मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भक्तिरसाचा आनंद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

पत्रकार : विजय रणभोर, पुणे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button