Maharashtra

हातभट्टी दारू अड्ड्यावर कन्नड पोलिसांची धडक कारवाई:-

हातभट्टी दारू अड्ड्यावर कन्नड पोलिसांची धडक कारवाई:-

जि. छ.संभाजीनगर. ता. (कन्नड): दि. 26 एप्रिल 2026:
कन्नड तालुक्यातील हिवरखेडा (गौताळा) येथे गावठी दारू निर्मितीवर कन्नड पोलिसांनी धडक कारवाई करत हातभट्टी अड्डा उद्ध्वस्त केला. उपविभागीय पोलीस अधिकारी अपराजिता अग्निहोत्री यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार ही कारवाई गुरुवारी रात्री करण्यात आली. माहितीच्या आधारे पोलिसांनी गयाबाई बसवराज राठोड यांच्या घराच्या पाठीमागील जागेवर छापा टाकला असता तेथे गावठी दारू तयार करण्याची भट्टी सुरू असल्याचे आढळून आले. यावेळी दारू निर्मितीसाठी वापरले जाणारे रसायन जप्त करून नष्ट करण्यात आले.

या प्रकरणी गयाबाई राठोड यांच्या विरोधात कन्नड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदर कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक कुणाल सूर्यवंशी, उपनिरीक्षक जामवाल, चौधरी, ठाकरे, ए.बी. पाटील यांचा समावेश होता. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस कर्मचारी रघुनाथ सानप करीत आहेत.

पत्रकार : विजय रणभोर, पुणे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button