जालना शहर २४ तास अंधारात; वीज वितरण कंपनीवर आमदारांचा संताप:-
जालना शहर २४ तास अंधारात; वीज वितरण कंपनीवर आमदारांचा संताप:-
जालना : दि. 25 एप्रिल 2026:-
जालना शहरासह परिसरातील सुमारे चार लाख नागरिकांना सलग वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार बबनराव लोणीकर यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांवर तीव्र संताप व्यक्त करत कडक इशारा दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील ३३ केव्ही लाईनमध्ये बिघाड झाल्याने सकाळी आठ वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी आठ वाजेपर्यंत तब्बल २४ तास वीजपुरवठा वारंवार खंडित झाला. या काळात नागरिकांना उष्णतेत अंधारात राहावे लागले.पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण
इन्व्हर्टर बंद पडले
डासांचा प्रादुर्भाव वाढला
आरोग्यावर परिणाम होण्याची भीती
दरम्यान, वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या कॉलनीत मात्र वीजपुरवठा सुरळीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला असून संताप व्यक्त केला जात आहे.
पत्रकार : विजय रणभोर, पुणे.


