राघव चड्ढा यांच्या फॉलोअर्समध्ये मोठी घसरण; राजकीय चर्चांना उधाण
राघव चड्ढा यांच्या फॉलोअर्समध्ये मोठी घसरण; राजकीय चर्चांना उधाण
नवी दिल्ली : राघव चड्डा यांच्या सोशल मीडिया उपस्थितीत अचानक मोठी घसरण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. भारतीय जनता पक्षात सामील झाल्याच्या वृत्तानंतर त्यांच्या इंस्टाग्राम फॉलोअर्समध्ये लक्षणीय घट झाल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी त्यांच्या इंस्टाग्राम खात्यावर सुमारे १.४६ कोटी फॉलोअर्स होते. मात्र, शनिवारी दुपारी ३ वाजेपर्यंत हा आकडा घसरून १.३४ कोटींवर आला. म्हणजेच, अवघ्या काही तासांतच १० लाखांहून अधिक फॉलोअर्स कमी झाल्याचे दिसून आले.
राजकीय विश्लेषकांच्या मते, ही घसरण विशेषतः ‘जेन-झेड’ आणि तरुण मतदारांच्या तीव्र प्रतिक्रियेचे प्रतीक मानली जात आहे. सोशल मीडियावर या घडामोडींवर विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
99722548429