Maharashtra
पुण्यात भररस्त्यात महिलेची प्रसूती; महिला डॉक्टर ठरल्या देवदूत
पुण्यात भररस्त्यात महिलेची प्रसूती; महिला डॉक्टर ठरल्या देवदूत
पुणे (शिरूर): शिरूर तालुक्यातील जोशीवाडी परिसरात माणुसकीचे हृदयस्पर्शी उदाहरण समोर आले आहे. एका गरोदर महिलेला रुग्णालयात नेत असताना अचानक भररस्त्यात प्रसूती कळा सुरू झाल्या. परिस्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधला.
यावेळी डॉ. सुनीता पोटे यांनी कोणतीही विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली आणि रस्त्यावरच यशस्वी प्रसूती केली. त्यांच्या तत्परतेमुळे आई आणि नवजात बाळ दोघांचेही प्राण वाचले. या घटनेमुळे परिसरात डॉक्टरांच्या कार्याचे मोठे कौतुक होत आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548429