भोकरला घराला आगलागल्याने सुमारे साडेतीन लाखाचे नुकसान, केवळ दैवबलवत्तर म्हणून बापूसाहेब विधाटे बचावले,
भोकरला घराला आगलागल्याने सुमारे साडेतीन लाखाचे नुकसान, केवळ दैवबलवत्तर म्हणून बापूसाहेब विधाटे बचावले,

टाकळीभान प्रतिनिधी – श्रीरामपूर तालुक्यातील भोकर शिवारातील विधाटेवस्ती येथे घराला लागलेल्या आगीत संसार उपयोगी साहीत्यासह मंडप डेकोरेशन मटेरीयल जळून खाक झाल्याने या कुटूंबाचे सुमारे साडेतीन लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घराला लागली त्यावेळी बापूसाहेब विधाटे हे त्याच घरात झोपलेले होते परंतू केवळ दैव बलवत्तर म्हणून नातीने आवाज दिल्याने ते सुखरूप बाहेर निघाले असले तरी त्यांचे अंगावरील कपडे बचावले, उन्हाच्या तडाख्यामुळे घरातून का हीच काढता आले नाही.
भोकर शिवारातील माणीकदेव रोडलगत असलेल्या विधाटे वस्ती येथे दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास 62 वर्षीय बापूसाहेब विधाटे हे घरात झोपलेले असताना त्यांच्या छपराला आग लागल्याचे नातीच्या लक्षात आले अन् तीने एकच ओरडा केला. आजोबांना जागे करून घराचे बाहेर येण्यास सांगीतले. गाढ झोपेतील बापूसाहेब हे घाईने घराचे बाहेर पळाल्याने ते सुखरूप बचावले आहे. आग लागल्याचे लक्षात येताच काही युवकांनी लागलीच नगराध्यक्ष करण ससाणे यांना कळविताच त्यांनी लागलीच श्रीरामपूर नगरपालीकेची अग्नीशामक गाडी पाठवून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला परंतू दुर्दैवाने तो पर्यंत उशीर झालेला होता. कडक उन्हात काही वेळात होत्याचे नव्हते झाले. मात्र कशामुळे लागली हे समजू शकले नाही मात्र प्रसंगावधान साधून येथील का ही तरूणांनी गॅस सिलेंडर बाहेर का ढल्याने पुढील अनर्थ टळला.
या आगीत विधाटे परीवाराकडे आलेल्या आजीच्या नव्या साड्या व मोबाईल जळाला. त्याचबरोबर या कुटूंबातील महिला वसुनेचे सुमारे एक तोळ्या मंगळसुत्र व अध्या तोळ्याचे टॉप्स, टिव्ही, लाकडी मांडणी, लहान मोठे अल्युनियम धातूचे 15 डबे अक्षरशः वितळून गेले. त्यातील वाळवण, कुरडया, पापड, डाळी आदि पुर्णपणे जळून गेले. गॅस शेगडीही या आगी चया भक्षस्थानी पडली. तसेच या परीवाराचे वापरते कपडे, चादर, सतरंजी, आंथरून व पांघरण्याचे कपडे, सुमारे आठ सहा वार साड्या व 6 नऊवार साड्या, पंधरा लीटर खाद्य तेलाचा भरलेला डबा, सुमारे सहा हजारांचा किराणा, ताट, तांब्या, प्लेट, घमेले, टप, चमचे, वाट्या, पोळपाट, लाटने, मिक्सर आदिंसह संसार उपयोगी सर्व साहीत्य जळून खाक झाले. त्याचबरोबर या कुटूंबाकडे मंडप व डेकोरशन साहित्य हि मोठ्या प्रमाणात होते. त्यातील मंडपचे कापड, विवाहासह इतर शुभ कार्यासाठी लागणारे डेकोरेशनचे साहीत्य असा सुमारे एक लाखा ऐवज या आगीत जळाला. त्यानुसार या कुटूंबाचे सुमारे साडेतीन लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
आग लागली त्यावेळी याकुटूंबातील 5 मोठे व तीन लहान मुले हे सर्व घरीच होते. शेजारी भावाकडे जागरण सोहळा संपन्न झालेला असल्याने पाहुण्याकडून आलेला आहेराचे कपडे ही या आगीत जळाले. या जागरण सोहळ्यात सर्वांनी जागरण के लेले होते त्यामुळे दिवसा सर्वजण झोपलेले असताना हि आग लागल्याने या कुटूंबाचे मोठे नुकसान झाले. हि घटना घडल्याचे समजताच लगतच्या शेतकरी कुटूंबानी मदतीचा प्रयत्न केला परंतूतो विफल ठरला. त्या नंतर गावातील अनेक प्रतिष्ठीतांनी या ठिकाणी भेट देवून या कुटूंबाचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला.
प्रतिनिधी: दिलीप लोखंडे श्रीरामपूर