मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं; अविनाश जाधव यांचं गुणरत्न सदावर्तेंना जाहीर आव्हान
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं; अविनाश जाधव यांचं गुणरत्न सदावर्तेंना जाहीर आव्हान
मुंबई:
मराठी भाषेच्या सक्तीच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव यांनी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना थेट आणि आक्रमक भाषेत प्रतिआव्हान दिले आहे. “सदावर्तेंनी ४ मे रोजी मीरा-भाईंदरमध्ये यावे, त्यांचे चॅलेंज मी स्वीकारले आहे,” असे खडेबोल जाधव यांनी सुनावले आहेत.
मराठी भाषेच्या सक्तीबाबत सदावर्ते यांनी केलेल्या काही विधानांवरून मनसे आक्रमक झाली आहे. या पार्श्वभूमीवर अविनाश जाधव यांनी सदावर्तेंना त्यांच्या प्रभावक्षेत्रात, म्हणजेच मीरा-भाईंदरमध्ये, येण्याचे आव्हान दिले आहे. “सदावर्तेंनी जी आव्हाने दिली आहेत, ती आम्हाला मान्य आहेत. आता त्यांनी ४ मे रोजी प्रत्यक्ष मैदानात उतरून दाखवावे,” असा जाधव यांचा इशारा आहे.
रिक्षाचालकांच्या आंदोलनाचा दावा फेटाळला
या वेळी जाधव यांनी सदावर्तेंकडून करण्यात आलेल्या रिक्षाचालकांच्या संपाच्या किंवा आंदोलनाच्या दाव्याचाही समाचार घेतला. १५ लाख रिक्षाचालक आंदोलनात सहभागी होणार असल्याचा दावा त्यांनी पूर्णपणे फेटाळून लावला आहे.
जाधव यांनी मांडलेली आकडेवारी
मुंबई महानगर क्षेत्रातील एकूण रिक्षा: सुमारे ४.१० लाख.
मराठी चालक: यातील जवळपास ६५ टक्के चालक मराठी असल्याचा जाधव यांचा दावा.
त्यामुळे १५ लाख चालकांच्या पाठिंब्याचा आकडा चुकीचा आणि दिशाभूल करणारा असल्याचे त्यांनी म्हटले.
मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर मनसे मागे हटणार नाही, असा इशाराही या आव्हानातून देण्यात आला आहे.
या वादामुळे मीरा-भाईंदर आणि परिसरातील राजकीय वातावरण अधिकच तापण्याची शक्यता आहे. मराठी भाषा, रिक्षाचालकांचा सहभाग आणि आगामी ४ मे रोजीची भूमिका यावर आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548429

