Maharashtra

हिमवर्षासारखी गारपीट! सांगलीत वादळी वाऱ्यासह जोरदार गारांचा वर्षाव

हिमवर्षासारखी गारपीट! सांगलीत वादळी वाऱ्यासह जोरदार गारांचा वर्षाव

19.03.26
सांगली, जिल्ह्यात आज अचानक बदललेल्या हवामानामुळे अनेक भागांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आणि गारांचा वर्षाव झाला. काही ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात गारपीट झाली की परिसर अक्षरशः पांढऱ्या चादरीने झाकल्यासारखा दिसत होता.
तासगाव, मिरज, वाळवा, कवठेमहांकाळ आदी तालुक्यांमध्ये या गारपीटीचा सर्वाधिक फटका बसला. दुपारनंतर अचानक ढग दाटून आले आणि काही मिनिटांतच वाऱ्याचा वेग वाढत गारांसह मुसळधार पाऊस सुरू झाला.
या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून द्राक्ष, आंबा, केळी, हरभरा, ज्वारी, कांदा आदी पिकांवर गारांचा मारा झाला. अनेक ठिकाणी उभ्या पिकांचे नुकसान होऊन शेतकरी चिंतेत सापडले आहेत.
वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे कोसळली, वीजतारा तुटल्या तर काही घरांच्या पत्र्यांचेही नुकसान झाले. स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उकाडा जाणवत असताना आज अचानक हवामानात बदल होऊन गारपीट आणि पावसामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र शेतीसाठी हा पाऊस मोठा धक्का मानला जात आहे.

प्रतिनिधी विजय रणभोर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button