Maharashtra

मिरकरवाडा जेटी परिसरात प्लास्टिक कचऱ्याच्या ढीगांमुळे प्रदूषणात वाढ, रत्नागिरी नगर परिषद स्वच्छता विभाग काय करत आहे? पर्यावरण प्रेमींचा सवाल

मिरकरवाडा जेटी परिसरात प्लास्टिक कचऱ्याच्या ढीगांमुळे प्रदूषणात वाढ, रत्नागिरी नगर परिषद स्वच्छता विभाग काय करत आहे? पर्यावरण प्रेमींचा सवाल

रत्नागिरी :दि.19 एप्रिल 2026:
रत्नागिरी शहरातील मिरकर वाडा मच्छी मार्केट परिसरामध्ये तसेच मिरकर वाडा बंदराच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक कचऱ्याचे ढीग निर्माण झाले असल्यामुळे प्रदूषण वाढ झाली असल्याचे बोलले जात आहे. स्वच्छ व सुंदर रत्नागिरी असा भोंगा वाजवत घंटागाडी संपूर्ण रत्नागिरी शहरात प्रत्येक वार्ड वार्ड मध्ये फिरत आहे. पण शहरातलाच एक महत्त्वाचा भाग असलेल्या मिरकर वाडा जेटी परिसर आणि मच्छी मार्केट परिसरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक कचऱ्याचे ढीग कसे काय साचून राहिले असा सवाल सध्या उपस्थित केला जात असून नगर परिषदेचा स्वच्छता विभाग नेमकं काय करीत आहे असाही सवाल पर्यावरण प्रेमी मधून उपस्थित केला जात आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातलं सर्वाधिक मोठं मानले जाणारे मच्छी बंदर म्हणजे मिरकर वाडा बंदर होय. मात्र या मिरकर वाडा बंदराच्या परिसरामध्ये कचरा टाकणाऱ्यांवर काहीशी शिस्त आणून देण्याची किंबहुना कायदेशीर बडगा उचलण्याची अत्यंत गरज निर्माण झाली आहे. उघड्यावर कचरा टाकल्यानंतर महाराष्ट्र नगरपरिषद कायद्यांतर्गत घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 अंतर्गत 5000 रुपयांपासून ते 25 हजार रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई होऊ शकते. त्याचप्रमाणे वारंवार नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई व्यतिरिक्त तीन महिन्यांपर्यंत कारावासाची शिक्षा सुद्धा होऊ शकते. असे काही कायदे शासनाने करून दिले आहेत.

मिरकर वाडा बंदर परिसरामध्ये प्लास्टिक कचऱ्याचे मोठे मोठे ढीग जमा झाले असून त्याची विल्हेवाट वेळीच लावण्यात येत नाही त्यामुळे त्या ठिकाणी दुर्गंधी निर्माण होते. त्याचप्रमाणे उघड्यावर प्लास्टिकच्या पिशव्या टाकल्यामुळे त्या ठिकाणी जनावरे येऊन त्या ठिकाणी घाणघुण करतात. रत्नागिरी शहर हे स्वच्छ सुंदर बनण्याकडे गेली अनेक वर्षापासून नगरपरिषदेचे कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. मात्र शहराचे महत्त्वाचा भाग असलेल्या मिरकरवाडा बंदराच्या स्वच्छतेकडे नगर परिषदेचे परिपूर्ण लक्ष आहे का असावा उपस्थित केला जात आहे. मात्र जेवढी जबाबदारी नगरपरिषदेची आहे तेवढीच जबाबदारी नागरिकांची देखील आहे. जिकडे जिकडे प्लास्टिक कचऱ्याचे ढीग असल्यामुळे मिरकर वाडा बंदर परिसर तसेच मच्छी मार्केट परिसर बकाल दिसून येत आहे.

विद्यमान महायुती सरकारच्या शासनकर्त्यांनी मिरकर वाडा बंदराच्या प्लास्टिक कचऱ्याच्या स्वच्छतेबाबत काहीतरी ठोस उपाय योजना करावी अशी मागणी आता पर्यावरण प्रेमी मधून करण्यात येत आहे.

पत्रकार : विजय रणभोर, पुणे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button