Maharashtra

सोमवार पासून टाकळीभान येथे श्री शंभू महादेवाचा यात्रौत्सव.

सोमवार पासून टाकळीभान येथे श्री शंभू महादेवाचा यात्रौत्सव

प्रतिनिधी टाकळीभान : श्रीरामपूर
तालूक्यातील टाकळीभानसह परीसराचे ग्रामदैवत असलेल्या श्री. महादेवाचा यात्रोत्सव सोमवार दिनांक २० एप्रिल व मंगळवार दिनांक २१ एप्रिल असा दोन दिवस साजरा होत असून या निमित्त विविध धार्मिक व मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
येथील मंदिर हे सुमारे सहाशे वर्षापुर्वीचे असून श्री. महादेव हे भक्तांना अद्भुत शक्ती देणारे असल्याचा अनेकांना प्रत्यय आलेला आहे. त्यामुळे परदेशातील शिवभक्तांनी या मंदिराला भेट दिलेली आहे. येथील श्री. महादेवाचा यात्रोत्सव वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षय तृतीया झाल्यावर जो पहिला सोमवार येईल त्या सोमवारी यात्रोत्सव साजरा करण्याची परंपरा रुढ झालेली आहे.
यात्रोत्सवासाठी यात्रा कमीटी महीनाभर आधी यात्रोत्सवाच्या कामाला लागलेली असते. लोक वर्गणीतून हा संपुर्ण उत्सव साजरा होत असल्याने यात्रा कमीटी घरोघर फिरुन यथाशक्ती लोकवर्गणी गोळा करुन यात्रोत्सव दिमाखात पार पाडत आसते. यात्रोत्सवा निमित्त मंदीराची रंगरंगोटी करण्यात आलेली असून परीसर स्वच्छ करण्यात आला आहे व मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
यात्रोत्सवा निमित्त २०एप्रिल सोमवार रोजी सकाळी ६ वाजता गंगाजल मिरवणूक, सकाळी ७ ते ११ वाजता
लघु रूद्राभिषेक, १२ वाजता दग्धाभिषेक, सायंकाळी ७वाजता शोभेच्या दारुची
आतषबाजी, रात्री ८ ते ९ वाजता पोथीची मिरवणूक व छबिना, रात्री ९ ते १२ या वेळेत किरणकुमार ढवळपुरीकर यांचे लोकनाट्य तमाशा होणार आहे. मंगळवारी सकाळी ८ ते १२ वाजता कलाकारांच्या हजेरीचा कार्यक्रम, दुपारी ४ ते ६ वाजता नामांकीत मल्लांचा कुस्त्यांचा जंगी हगामा, रात्री ८ ते ११ वाजता निता पाटील पुणेकर यांचा ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम होणार आहे.
येथील श्री. महादेव मंदिर पुरातन असून मंदिराचे बांधकाम संपुर्ण दगडी आहे मंदिराच्या आतील व बाहेरील बाजूस सुंदर कोरीव नक्षीकाम केलेले आहे. मंदिराच्या मुख्य गाभार्यात भव्य अशी श्री. महादेवाची पिंड आहे. मागील बाजूस पार्वतीची मूर्ती आहे. समोरच्या गाभार्यात भव्य कासव व उजव्या सोंडेच्या गणपतीची भव्य मूर्ती आहे. याच गाभार्यात श्री. विष्णूंनी घेतलेल्या विविध आवतारांच्या सुंदर मुर्ती कोरलेल्या आहेत.अनेक ठिकाणी मंदिराचे प्रवेशडर हे पुर्वे दिशेला असते मात्र येथील मंदिराचे प्रवेशडर हे पश्चीम दिशेला आहे. त्यामुळे मनातील इच्छा पुर्ण करणारा महादेव म्हणून या श्रद्धास्थानाकडे पाहिले जाते. त्यामुळे यात्रे निमित्त भाविक अवर्जून येतात व श्री. महादेवाच्या चरणी नतमस्तक होतात. तरी भाविकांनी यात्रेत सहभागी व्हावे व वर्गणीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन सर्व ग्रामस्थ व यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे,

प्रतिनिधी: दिलीप लोखंडे श्रीरामपूर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button