Maharashtra
नाशिक-मुंबई महामार्गावर कंटेनर-बाईक अपघात; दोघे गंभीर
नाशिक-मुंबई महामार्गावर कंटेनर-बाईक अपघात; दोघे गंभीर
कळवा | १८ एप्रिल : नाशिक-मुंबई महामार्गावरील खाडी ब्रिजजवळ कंटेनर आणि बाईकमध्ये अपघात होऊन दोन जण गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल, कळवा येथे दाखल करण्यात आले आहे.
कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून अपघाताचे कारण वेग आणि चालकाची चूक असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेनंतर परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
प्रतिनिधी सिंथिया कोरिया मुंबई