पिंपरी-चिंचवड हादरले! काळेवाडीत अडीच वर्षांच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार; नराधम आरोपीला अटक
पिंपरी-चिंचवड हादरले! काळेवाडीत अडीच वर्षांच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार; नराधम आरोपीला अटक
पिंपरी-चिंचवड: पुण्याच्या शेजारील पिंपरी-चिंचवड शहरातील काळेवाडी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका अडीच वर्षांच्या निष्पाप चिमुरडीवर ४७ वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले असून, पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घृणास्पद घटना सोमवारी दुपारी काळेवाडी भागात घडली. आरोपी विजय भोसले (वय ४७) याने बालिकेला आंब्याचे आमिष दाखवून स्वतःच्या खोलीत नेले. तिथे त्याने या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केला.
पोलिसांची कारवाई
घटनेची माहिती मिळताच पीडितेच्या आईने तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. आईच्या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी युद्धपातळीवर तपास चक्रे फिरवून आरोपी विजय भोसले याला अटक केली आहे.
या निर्घृण घटनेमुळे काळेवाडी आणि संपूर्ण पिंपरी-चिंचवड परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. एका अडीच वर्षांच्या बालिकेसोबत घडलेल्या या प्रकारामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण असून, आरोपीला कठोरत-कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील अधिक तपास करत आहेत.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे
9822548429