Maharashtra

लोकसभेच्या जागा वाढवण्याचा प्रस्ताव; खासदारांना विधेयकाचा मसुदा पाठवला

लोकसभेच्या जागा वाढवण्याचा प्रस्ताव; खासदारांना विधेयकाचा मसुदा पाठवला

नवी दिल्ली : केंद्र सरकारने Lok Sabha मधील जागांची संख्या वाढवण्याचा महत्त्वाचा प्रस्ताव मांडला आहे. सध्या ५४३ असलेल्या जागा वाढवून ८५० करण्याचा विचार असून, यासंदर्भातील विधेयकाचा मसुदा खासदारांना पाठवण्यात आला आहे.
या प्रस्तावानुसार, एकूण ८५० जागांपैकी सुमारे ८१५ जागा राज्यांसाठी तर ३५ जागा केंद्रशासित प्रदेशांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. लोकसंख्या आणि प्रतिनिधित्व यामधील संतुलन राखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.
जागा वाढवण्याच्या या निर्णयानंतर महिला आरक्षण विधेयकाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच, या विषयावर संसदेत विशेष अधिवेशन बोलावले जाण्याची शक्यता आहे.
या प्रस्तावामुळे देशाच्या राजकीय संरचनेत मोठे बदल होण्याची चिन्हे दिसत असून, सर्व पक्षांकडून यावर चर्चा होण्याची अपेक्षा आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे
9822548429

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button