समाज शक्तिशाली तरच देश शक्तिशाली.
श्रीरामपूरच्या हिंदू संमेलनात डॉ. भाडेसिया यांचे प्रतिपादन विराट हिंदू संमेलन

टाकळीभान प्रतिनिधी:-श्रीरामपूर येथे आयोजित विराट हिंदू संमेलनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम क्षेत्र संघचालक डॉ. जयंती भाई भाडेसिया यांनी हिंदू समाजाला संघटित होण्याचे आवाहन केले. संस्कारांचे जतन आणि अन्यायाचा प्रतिकार हेच खऱ्या स्वातंत्र्याचे लक्षण असल्याचे सांगत त्यांनी सामाजिक शक्ती वाढवण्यावर भर दिला. समाज शक्तीशाली, तरच देश शक्तीशाली, असे ते म्हणाले.
संमेलनाला श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास, अयोध्या यांचे कोषाध्यक्ष तथा श्रीकृष्ण जन्मभूमी न्यास, मधुरा उपाध्यक्ष गोविंददेवगिरीजी केले.
महाराज, सराला बेटाचे महंत रामगिरी महाराज, तसेच अध्यक्षस्थानी उद्योजक बाबासाहेब काळे उपस्थित होते. डॉ. भाडेसिया यांनी भारतमाता गुलामीतून मुक्त करण्यासाठी हिंदू समाजाने केलेल्या संघर्षाचा उल्लेख करत डॉ. केशवराव हेडगेवार, बिरसा मुंडा, संत रोहिदास महाराज, भगवान श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या विचारांनी समाजाला दिशा दिल्याचे सांगितले. भारतीय संस्कृतीचा प्रभाव जगभर वाढत असताना आपणच आपल्या संस्कारांपासून दूर जात आहोत, ही चिंतेची बाब आहे असे त्यांनी नमूद
समाज शक्तिशाली असेल तर देश शक्तिशाली होतो. संकटाच्या काळात शासन एकटे पुरेसे ठरत नाही, समाजाने पुढे वावे लागते, असे सांगत त्यांनी हिंदू समाजाने संघटित होण्याचे आवाहन केले. निसर्गपूजा, वृक्षारोपण, जलसंवर्धन आणि परंपरांचे जतन ही हिंदू जीवनपद्धतीची वैशिष्ट्ये असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
महंत रामगिरी महाराज यांनीही आपल्या भाषणात संस्कारांचा अभाव ही गंभीर समस्या असल्याचे सांगितले. देश स्वतंत्र होऊन दशके लोटली तरी समाजात अन्यायाच्या घटना घडत आहेत. अन्यायाला
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त श्रीरामपूर येथे पार पडलेल्या विराट हिंदू संमेलनात डॉ. जयंतीभाई भाडेसिया आणि महंत रामगिरी महाराज यांनी समाज संस्कारांपासून दूर जात असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. केवळ राजकीय स्वातंत्र्य पुरेसे नसून समाजाने संघटित होऊन राष्ट्रनिर्माण आणि संस्कार जतनासाठी सक्रिय होणे आवश्यक असल्याचे आवाहन या प्रसंगी करण्यात आले.
प्रतिकार करण्याची ताकद निर्माण करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. तरुण पिढी जागृत होत असली तरी ही जागृती अपुरी असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
समाजाने संघटित होऊन धर्म, संस्कृती आणि राष्ट्ररक्षणासाठी पुढे यावे, असा संदेश देत संमेलनात सामाजिक समरसतेचा आणि राष्ट्रनिर्माणाचा संकल्प व्यक्त करण्यात आला. संमेलनाला विविध संत-महत, वारकरी संप्रदायातील प्रतिनिधी, विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी, हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिनिधी: दिलीप लोखंडे श्रीरामपूर


