खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेच्या विश्वासाची गरुड भरारी:
खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेच्या विश्वासाची गरुड भरारी:
सन २०२५-२६ आर्थिक वर्षात ३८ लाख निव्वळ दमदार नफ्यासह ९७.२०% वसूली;
रत्नागिरी :दि. 12 एप्रिल 2026:
खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेच्या विश्वासाची भक्कम वाटचाल, सन २०२५-२६ आर्थिक वर्षात ३८ लाख निव्वळ दमदार नफ्यासह ९७.२०% वसूली लाखांहून अधिक निव्वळ नफा, आणि अत्यल्प १.८४% नेट NPA हे दाखवतात की आपण फक्त वाढलो नाही, तर योग्य मार्गाने, प्रामाणिकपणे आणि शिस्तबद्धपणे वाढलो आहोत असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष संतोष पावरी यांनी व्यक्त केले आहे.
व्यवसाय वृद्धीचा विचार करता,
खेळते भांडवल २४.१७% ने वाढले
स्वनिधी २१.४७% ने वाढला
ठेवी २५.०३% ने वाढल्या
कर्ज वितरण ३२.५८% ने वाढले
गुंतवणूक ११.९१% ने वाढली
निव्वळ नफा १७.९६% ने वाढला
ही प्रगती आपल्या सर्वांच्या एकजुटीचा आणि परिश्रमांचा परिणाम आहे. गेल्या सात वर्षांत संस्थेने सातत्याने वर्धिष्णू आर्थिक वाटचाल करत सहकार क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
आजच्या स्पर्धात्मक आणि बदलत्या आर्थिक परिस्थितीतही संस्था आर्थिक शिस्त, पारदर्शकता आणि ग्राहकाभिमुख सेवा जपत पुढे जात आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार, शाखा विस्तार, आणि सभासदांच्या हिताला प्राधान्य देत संस्था सर्वांना विश्वासार्ह आर्थिक सेवा देत आहे.
सात वर्षांचा विचार केला, तर ही वाटचाल केवळ आर्थिक प्रगतीची नाही, तर सहकाराच्या संस्कारांची आहे. आपण केवळ व्यवहार केला नाही, तर विश्वास कमावला. आपण केवळ नफा मिळवला नाही, तर नातेसंबंध जपले आणि म्हणूनच ही संस्था आज प्रत्येक सभासदाच्या मनात घर करून आहे. असे मत संतोष पावरी यांनी व्यक्त केले आहे.
संतोष पावरी पुढे म्हणाले, मला अभिमान वाटतो की, या संस्थेच्या माध्यमातून आपण समाजातील अनेक कुटुंबांना आर्थिक आधार दिला, त्यांच्या स्वप्नांना बळ दिलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचा आनंद पाहिला. ही प्रगती माझी किंवा काही जणांची नाही,
ही प्रगती आहे आपल्या प्रत्येक सभासदाची, प्रत्येक ठेवीदाराची, प्रत्येक कर्मचाऱ्याची आणि प्रत्येक सहकाऱ्याची. आपल्या सर्वांच्या निःस्वार्थ सहकार्यामुळेच आज ही संस्था सक्षम, स्थिर आणि विश्वासार्ह बनली आहे. यापुढील काळातही आपण याच एकतेने, प्रामाणिकपणाने आणि विश्वासाने पुढे जाऊ या.
अधिकाधिक आर्थिक व्यवहार करून आपल्या संस्थेला आणखी सक्षम बनवू या. असे मत संतोष पावरी यांनी व्यक्त केले आहे.
पत्रकार :विजय रणभोर, पुणे.
