Maharashtra

पुणे शहर पोलीस यांच्या वाहतूक विभागाकडून बुलेट सायलेन्सरविरोधात विशेष कारवाई

पुणे शहर पोलीस यांच्या वाहतूक विभागाकडून बुलेट सायलेन्सरविरोधात विशेष कारवाई

माननीय श्री हिम्मत जाधव, पोलीस उपायुक्त, पुणे शहर पोलीस यांच्या आदेशान्वये बेकायदेशीर व आवाज करणाऱ्या बुलेट सायलेन्सरविरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली.
खडकी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री केंद्रे साहेब, तसेच पोलीस हवालदार नितीन कारले, निलेश पुकाळे व ज्ञानदेव शिंगाडे यांनी संयुक्त कारवाई करत तब्बल ७५ बुलेट सायलेन्सरवर कारवाई केली. संबंधित वाहनांवरील बेकायदेशीर सायलेन्सर काढून जप्त करण्यात आले.
जप्त केलेले सर्व सायलेन्सर वाहतूक शाखा, पुणे शहर येथे जमा करण्यात आले असून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.
या मोहिमेमुळे अनावश्यक ध्वनीप्रदूषणावर आळा बसण्यास मदत होणार असून वाहनचालकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button