Maharashtra
सांगली वकील संघटनेची लढत अटीटतीची :-
सांगली वकील संघटनेची लढत अटीटतीची :-
सांगली :दि. 25 एप्रिल 2026:-
सांगली वकील संघटनेच्या निवडणुकीत यंदा चुरशीची लढत रंगणार असून अध्यक्षपदासाठी चंद्रकांत माने, फारूख मुजावर आणि सूर्यकांत यादव यांच्यात तिरंगी सामना निश्चित झाला आहे. उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव आणि सदस्य अशा १४ जागांसाठी एकूण २५ उमेदवार रिंगणात आहेत.
एकूण ६२७ वकील मतदानासाठी पात्र असून, अर्ज माघारीनंतर काही जागा बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित महत्त्वाच्या पदांसाठी काट्याची टक्कर अपेक्षित आहे. उमेदवारांकडून सोशल मीडिया व प्रत्यक्ष भेटीद्वारे प्रचाराला जोर आला आहे.
दि. ३० एप्रिल रोजी मतदान होणार असून सायंकाळी मतमोजणी पार पडणार आहे. या निवडणुकीकडे जिल्ह्या चे लक्ष लागले आहे.
पत्रकार : विजय रणभोर, पुणे.

