Maharashtra

गॅस टंचाईचा भडका: सिलिंडर न मिळाल्याने नागरिकाचा टोकाचा संताप

गॅस टंचाईचा भडका: सिलिंडर न मिळाल्याने नागरिकाचा टोकाचा संताप

छत्रपती संभाजीनगर:
वाळूज परिसरात गॅस सिलिंडरच्या टंचाईमुळे एक धक्कादायक घटना घडली आहे. रांजणगाव शेपू येथील ५० वर्षीय बालचंद नेमाने यांनी अनेक दिवसांपासून गॅस सिलिंडरसाठी वारंवार गॅस एजन्सीकडे चकरा मारल्या, मात्र त्यांना सिलिंडर मिळत नव्हता.
शुक्रवारी पुन्हा एकदा एजन्सीवर जाऊनही रिकाम्या हाताने परतावे लागल्याने नेमाने यांचा संताप अनावर झाला. नैराश्यातून त्यांनी गॅस एजन्सीसमोरच स्वतःचे डोके फोडून घेतले. रक्तबंबाळ अवस्थेत ते स्वतःलाच मारहाण करत असल्याचे पाहून उपस्थित नागरिक हादरले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व जखमी नेमाने यांना तातडीने घाटी रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, गॅस टंचाईमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून पुरवठा सुरळीत करण्याची मागणी जोर धरत आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548429

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button