Maharashtra
दिल्ली विमानतळावर मोठी दुर्घटना टळली
दिल्ली विमानतळावर मोठी दुर्घटना टळल
नवी दिल्ली: इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन विमानांच्या पंखांची एकमेकांना धडक होऊन मोठी दुर्घटना टळली. Akasa Air आणि SpiceJet यांच्या विमानांचा टॅक्सीइंग दरम्यान संपर्क झाला.
या घटनेत विमानांचे किरकोळ नुकसान झाले असले तरी सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित आहेत. घटनेनंतर दोन्ही विमानांना तातडीने थांबवण्यात आले.
या प्रकरणाची चौकशी Directorate General of Civil Aviation (DGCA) कडून सुरू करण्यात आली असून, नेमकी चूक कुणामुळे झाली याचा शोध घेतला जात आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे

