Uncategorized

कॉपीप्रकरणामुळे राजे शाहाजी कनिष्ठ महाविद्यालय अंबेलोहळ चर्चेत; परीक्षा केंद्र मान्यता रद्द करण्याची शिफारस:-

कॉपीप्रकरणामुळे राजे शाहाजी कनिष्ठ महाविद्यालय अंबेलोहळ चर्चेत; परीक्षा केंद्र मान्यता रद्द करण्याची शिफारस:-

जि. छ. संभाजीनगर:ता. (गंगापूर):दि. 26 एप्रिल 2026:
माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी/मार्च २०२६ दरम्यान घडलेल्या गैरप्रकाराच्या प्रकरणामुळे राज्ये शाहाजी कनिष्ठ महाविद्यालय, अंबेलोहळ ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर हे महाविद्यालय चर्चेत आले आहे. जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर (माध्यमिक शिक्षण विभाग) यांनी यासंदर्भात विभागीय शिक्षण उपसंचालक यांना सविस्तर पत्र पाठवून कठोर कारवाईची शिफारस केली आहे.

जिल्हा परिषद शिक्षण विभागाने पाठवलेल्या पत्रानुसार, दिनांक १० फेब्रुवारी २०२६ रोजी गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती गंगापूर यांनी संबंधित परीक्षा केंद्राला भेट दिली असता, इयत्ता १२ वी इंग्रजी विषयाच्या पेपरदरम्यान ०१ विद्यार्थी कॉपी करताना आढळून आला. यानंतर संबंधित विद्यार्थ्यावर नियमानुसार कॉपी केस नोंदविण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.

पत्रात पुढे नमूद केल्याप्रमाणे, शासन निर्णय व परीक्षा केंद्रांवरील कॉपीमुक्त अभियानाच्या सूचनांनुसार, परीक्षा केंद्रावर गैरप्रकार आढळल्यास संबंधित केंद्राविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश आहेत. त्यानुसार, फेब्रुवारी/मार्च २०२६ च्या इयत्ता १० वी व १२ वी परीक्षांमध्ये गैरप्रकार आढळून आल्याने संबंधित केंद्राची मान्यता पुढील वर्षापासून कायमस्वरूपी रद्द करण्याबाबत शिफारस करण्यात आली आहे.

या पत्राच्या प्रती जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद), विभागीय सचिव (शिक्षण मंडळ) तसेच संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य यांनाही माहितीस्तव पाठविण्यात आल्या आहेत.

या प्रकरणामुळे जिल्ह्यातील परीक्षा व्यवस्थापन, कॉपीमुक्त अभियान आणि शिक्षण व्यवस्थेच्या पारदर्शकतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आता विभागीय स्तरावर नेमकी कोणती कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पत्रकार : विजय रणभोर, पुणे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button