Maharashtra
सोलापूर : संशयी पतीकडून पत्नीला जाळण्याचा प्रयत्न, आरोपी फरार
सोलापूर : संशयी पतीकडून पत्नीला जाळण्याचा प्रयत्न, आरोपी फरार
सोलापूरच्या लोकमान्य नगर भागात एका पतीने घरगुती वादातून पत्नीच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत नर्गिस ही महिला गंभीर भाजली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, आरोपी फैजान जावेद शेख घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.
