Maharashtra

भोसरीत संत सेना महाराज जयंती भक्तीमय वातावरणात उत्साहात साजरी

भोसरीत संत सेना महाराज जयंती भक्तीमय वातावरणात उत्साहात साजरी

भोसरी येथील संत सेना महाराज मंदिरात मंगळवार दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी पहाटे 6.30 वाजता संत सेना महाराज जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली.
यावेळी संत सेना महाराजांच्या मूर्तीचे विधिवत पूजन करण्यात आले. मंदिर परिसरात दिवे प्रज्वलित करून सुंदर रांगोळ्या काढण्यात आल्या. भाविकांनी मोठ्या श्रद्धेने व भक्तिभावाने दिवे लावून संपूर्ण परिसर उजळून टाकला होता.
यानंतर सर्व भाविकांनी एकत्र येत संत सेना महाराजांची आरती केली. या कार्यक्रमात संत सेना महाराज मंदिर महिला मंडळाच्या अध्यक्षा स्नेहा निलेश गायकवाड, स्थानिक नागरिक, विश्वस्त मंडळ तसेच महिला मंडळाचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.
आरतीनंतर उपस्थितांना प्रसादाचे वितरण करण्यात आले. एकूणच संत सेना महाराज जयंती भोसरीत मोठ्या उत्साहात आणि भक्तीपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.

प्रतिनिधी विजय अडसूळ

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button