Uncategorized
लाडक्या बहिणींना सरकारचा दणका; बोगस लाभार्थ्यांकडून ११ कोटींची वसुली
लाडक्या बहिणींना सरकारचा दणका; बोगस लाभार्थ्यांकडून ११ कोटींची वसुली
मुंबई:
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या महिलांवर राज्य सरकारने आता कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. खोटी माहिती देऊन योजनेचे पैसे लाटणाऱ्या १२,११५ अपात्र महिलांविरुद्ध प्रशासनाने मोहीम उघडली असून, आतापर्यंत ११ कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांचाही समावेश
या कारवाईत सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, २,६५२ महिला सरकारी कर्मचाऱ्यांनी देखील नियमांचे उल्लंघन करून या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. या कर्मचाऱ्यांनी एकूण ३.५८ कोटी रुपये लाटले होते. प्रशासनाने तातडीने पावले उचलत या कर्मचाऱ्यांकडून आतापर्यंत निम्मी रक्कम वसूल केली आहे
या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपये अर्थसाहाय्य दिले जाते. मात्र, या कारवाईमुळे आता बोगस लाभार्थ्यांचे धाबे दणाणले आहेत.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548429