बोपोडीतील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा यशस्वी निकाल; तीन विद्यार्थ्यांची पोलीस दलात निवड

बोपोडीतील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा यशस्वी निकाल; तीन विद्यार्थ्यांची पोलीस दलात निवड
पुणे, दि. ___ : नुकत्याच पार पडलेल्या पोलीस भरती प्रक्रियेत बोपोडी येथील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा उल्लेखनीय यश मिळाले आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक, टिकाराम जगन्नाथ महाविद्यालय आणि समर्थ युवा फाउंडेशन संचलित या केंद्रातील तीन विद्यार्थ्यांची पोलीस दलात निवड झाली आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये अथर्व विजय हरिहर, कुणाल भिमाशंकर बमणलीकर यांची पिंपरी चिंचवड पोलीस दलात, तर प्रणव संजय माने यांची पुणे शहर पोलीस दलात निवड झाली आहे.
या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत असून, मार्गदर्शन केंद्रातील शिक्षक व मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे विशेष कौतुक केले आहे. कठोर परिश्रम, योग्य मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण अभ्यास यांच्या जोरावर विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले असल्याचे सांगण्यात आले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेकडून तसेच नागरिकांकडून मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे
9822548429

