Maharashtra

रांजणगाव महागणपती येथे गॅस वितरकांविरोधात तक्रारी, कारवाईची मागणी;

रांजणगाव महागणपती येथे गॅस वितरकांविरोधात तक्रारी, कारवाईची मागणी;

जि.पुणे.ता. (रांजणगाव):दि. 10 एप्रिल 2026:
रांजणगाव महागणपती – औद्योगिक व धार्मिक महत्त्व असलेल्या रांजणगाव महागणपती मंदिर परिसरात घरगुती गॅस वितरणाबाबत गंभीर तक्रारी समोर येत आहेत. नागरिकांकडून आरोप करण्यात येत आहे की, काही Bharat Gas वितरकांकडून ग्राहकांकडून ठरलेल्या दरापेक्षा जादा पैसे उकळले जात आहेत.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, गॅस सिलिंडर वितरणाच्या वेळी अधिक पैसे घेण्याचा प्रकार सर्रास सुरू असून, त्यामुळे सर्वसामान्यांची आर्थिक लूट होत आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर संबंधित प्रशासन, पोलीस स्टेशन तसेच राज्य सरकारने तातडीने दखल घेऊन दोषी वितरकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. तसेच अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी जादा दंड आकारण्यात यावा आणि ग्राहकांना दिलासा द्यावा, अशीही अपेक्षा व्यक्त होत आहे.

नागरिकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना शिक्षा देण्याची मागणी केली असून, भविष्यात अशा प्रकारांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली आहे.

पत्रकार : विजय रणभोर, पुणे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button