Maharashtra

शिरूर येथे महिलांसाठी विशेष शिबिर; ‘माझे अस्तित्व’ योजनेअंतर्गत लाभ वाटप

शिरूर येथे महिलांसाठी विशेष शिबिर; ‘माझे अस्तित्व’ योजनेअंतर्गत लाभ वाटप

पुणे, दि. ९ एप्रिल २०२६ — जिल्हा परिषद पुणे अंतर्गत महिला बालविकास विभाग व पंचायत समिती शिरूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘माझे अस्तित्व एकल महिला योजना’ अंतर्गत (क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना) लाभार्थींना लाभ वाटप करण्यासाठी तालुकास्तरीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर गुरुवार, दि. ९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत पंचायत समिती शिरूर परिसरात आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये एकल महिलांसाठी विविध शासकीय योजनांची माहिती देऊन त्यांना आर्थिक व सामाजिक सहाय्य देण्याचा उद्देश आहे. पात्र लाभार्थींनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन संबंधित विभागाकडून करण्यात आले आहे.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व मोठे असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पत्रकार विजय रणभोर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button