Maharashtra

तरुण-तरुणीकडून पैसे उकळले; वाघोलीतील ३ पोलिस सस्पेंड

तरुण-तरुणीकडून पैसे उकळले; वाघोलीतील ३ पोलिस सस्पेंड

पुणे शहरातील वाघोली पोलीस ठाण्यातील ३ पोलिस कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पुणे पोलिस आयुक्तालयाने ही कारवाई करत शिस्तभंगाविरोधात कडक भूमिका घेतल्याचे स्पष्ट केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित पोलिसांनी एका तरुण-तरुणीकडून धमकी देत गुन्ह्यात अडकवतो असे सागून सुमारे ₹10,000 उकळल्याचा आरोप आहे. तसेच, या प्रकरणात तरुणाला मारहाण केल्याचाही प्रकार समोर आला आहे. घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचताच तातडीने चौकशी सुरू करण्यात आली आणि प्राथमिक चौकशीनंतर संबंधित तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले..
या घटनेमुळे पोलीस दलाच्या प्रतिमेला धक्का बसला असून, पुढील तपास सुरू आहे. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे संकेत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button