Maharashtra

पनवेल शहर पोेलिसांची अवैधरित्या गावठी दारु निर्मितीच्या हातभट्टीवर कारवाई;

पनवेल शहर पोेलिसांची अवैधरित्या गावठी दारु निर्मितीच्या हातभट्टीवर कारवाई;

पनवेल : दि. 07 एप्रिल 2026:
पनवेल शहर पोलिसांनी अवैधरित्या गावठी दारु निर्मितीच्या हातभट्टीवर धडक कारवाई करून 16 बॅरल अंदाजे 3000 लीटर गावठी दारु जप्त केली आहे.

पनवेल शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कुंडेवहाळ येथील कोरीपासून पुढे सुमारे 3 किलोमीटर अंतरावर डोंगराच्या टोकावरील जंगल परिसरात अवैधरित्या गावठी दारू निर्मितीची हातभट्टी सुरू असल्याची गोपनीय माहिती पनवेल शहर पोलिसांना प्राप्त झाली होती. सदर माहितीच्या आधारे तात्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी कारवाई पथक तयार करून नमूद ठिकाणी छापा टाकण्यात आला.

छाप्यामध्ये 16 बॅरल मधील अंदाजे 3000 लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली असून ती जागीच नष्ट करून दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे साहित्यही हस्तगत करण्यात आले आहे. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. सदर कारवाई दारूबंदी अधिनियम कलम 65 (फ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आली असून वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रविण फडतरे, पोहवा अमोल पाटील, संदेश म्हात्रे, मिथुन भोसले, विशाल दुधे, सचिन कोर, किरण कराड आदींच्या पथकाने केली आहे.

पत्रकार :विजय रणभोर, पुणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button