Maharashtra

भारतीय जनता पार्टीचा ४६ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा ;

भारतीय जनता पार्टीचा ४६ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा ;

सांगली. दि. 06 एप्रिल 2026: भारतीय जनता पार्टी च्या ४६ व्या स्थापना दिनानिमित्त सांगली येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. “जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष” म्हणून पक्षाची ओळख अधिक दृढ होत असल्याचा विश्वास यावेळी उपस्थित नेत्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमात आमदार गोपीचंद पडळकर, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, शहराध्यक्ष प्रकाश ढंग, माजी मंत्री तथा ज्येष्ठ नेते आण्णासाहेब डांगे, सांगलीचे महापौर धीरज सूर्यवंशी, गटनेते संदीप आवटी, माजी आमदार भगवानराव साळुंखे, तसेच प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी सर्व मान्यवरांनी आपल्या मनोगतातून पक्षाच्या वाटचालीचा आढावा घेत, आगामी काळात संघटन अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला. केंद्र व राज्यातील सरकारच्या कामगिरीचा उल्लेख करत, सामान्य जनतेपर्यंत विकासकामे पोहोचवण्यावर भर देण्यात आला.

कार्यक्रमाला भाजपाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. घोषणाबाजी, उत्साहपूर्ण वातावरण आणि पक्षनिष्ठेची झलक यामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.

पत्रकार :विजय रणभोर, पुणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button