छत्रपती संभाजीनगर : महापालिका बैठकीत नावाच्या मुद्द्यावरून तणाव
छत्रपती संभाजीनगर : महापालिका बैठकीत नावाच्या मुद्द्यावरून तणाव
औरंगाबाद न म्हणता छत्रपती संभाजीनगरच वापरा : सभापती अनिल मकरीये यांचा MIM नगरसेवकांना इशारा
छत्रपती संभाजीनगर, ५ एप्रिल २०२६ : महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पीय बैठकीत शहराच्या नावावरून जोरदार वाद झाला. काही MIM पक्षाच्या नगरसेवकांनी ‘औरंगाबाद’ असा उल्लेख केल्याने वातावरण ढवळून निघाले.
सभापती अनिल मकरीये यांनी यावर कडक भूमिका घेतली. “औरंगाबाद नाही, छत्रपती संभाजीनगरच म्हणा. अन्यथा निधी मंजूर होणार नाही आणि विकासकामेही रखडतील,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. त्यांनी सर्व नगरसेवकांना अधिकृत कागदपत्रे आणि शासनमान्य नावच बैठकीत वापरण्याचे निर्देश दिले.
या वादामुळे बैठक काही काळ गोंधळली, मात्र मकरीये यांच्या सूचनेनुसार चर्चा पुढे नेली गेली. शहराच्या नाव बदलानंतर असे प्रकार वाढत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे
