शिक्षण क्षेत्रातील दीपस्तंभ मावळला;वळसंग जि.प. शाळेच्या माजी मुख्याध्यापिका शांताबाई उबाळे यांचे निधन

शिक्षण क्षेत्रातील दीपस्तंभ मावळला;वळसंग जि.प. शाळेच्या माजी मुख्याध्यापिका शांताबाई उबाळे यांचे निधन
वळसंग : येथील जिल्हा परिषद शाळेच्या माजी मुख्याध्यापिका आदरणीय शांताबाई उबाळे यांचे आज दुःखद निधन झाले.त्यांच्या जाण्याने वळसंग परिसरातील शिक्षण क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून,एका शिस्तप्रिय आणि प्रेमळ मार्गदर्शकाला समाज मुकला आहे.
शांताबाई उबाळे यांनी आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात वळसंग जिल्हा परिषद शाळेत अत्यंत निष्ठेने कार्य केले. केवळ एक मुख्याध्यापिका म्हणूनच नव्हे,तर विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श शिक्षक आणि मार्गदर्शक म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी आपल्या कार्यकाळात शाळेच्या प्रगतीसाठी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या हाताखाली शिकलेले हजारो विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत यशस्वीपणे कार्यरत आहेत.अत्यंत साधी राहणी आणि उच्च विचारसरणी लाभलेल्या उबाळे मॅडम आपल्या शिस्तप्रिय स्वभावासाठी आणि तितक्याच प्रेमळ वागणुकीसाठी ओळखल्या जात. त्यांच्या निधनाची बातमी समजताच वळसंग परिसरात आणि त्यांच्या माजी विद्यार्थी वर्गात शोककळा पसरली आहे.
वळसंग परिसरातील नागरिक,शिक्षक वर्ग आणि माजी विद्यार्थ्यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.
प्रतिनिधी : संजय कोळी.जत/सांगली.
७८७५९०३७७७.

