Maharashtra

जिल्हा परिषद शाळेत प्रवेश प्रक्रिया सुरू; पालकांना प्रतिसाद देण्याचे आवाहन

जिल्हा परिषद शाळेत प्रवेश प्रक्रिया सुरू; पालकांना प्रतिसाद देण्याचे आवाहन

पारध बु. (प्रतिनिधी) : येथील जिल्हा परिषद व उच्च प्राथमिक शाळा, पारध बु. (केंद्र – पिंपळगाव रेणुकाई) येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ८ वीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. शाळेत आधुनिक सुविधा व गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध असल्याने पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

शाळेत डिजिटल वर्गखोल्या व ई-लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण दिले जाते. तसेच महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश आणि सकस पोषण आहाराची सुविधा उपलब्ध आहे. मुलींसाठी विशेष उपस्थिती भत्ता दिला जात असून क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास केला जातो. अनुभवी व प्रशिक्षित शिक्षकवर्ग विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहे.

प्रवेशासाठी जन्म दाखला, आधार कार्ड (विद्यार्थी व पालक), जातीचा दाखला (लागू असल्यास), रहिवासी पुरावा व पालकांचा पासपोर्ट आकाराचा फोटो आवश्यक असल्याचे शाळा प्रशासनाने कळविले आहे.

दरम्यान, पारध येथील सामाजिक कार्यकर्ते महेंद्र बेराड यांनी पालकांनी आपल्या मुलांचा प्रवेश जिल्हा परिषद शाळेत करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button