सांगली येथे नदीसेवेत दीर्घकाळ असणाऱ्या 9 संघटनांना ” कृष्णमाई सुपुत्र सामाजिक गौरव पुरस्कार ;
सांगली येथे नदीसेवेत दीर्घकाळ असणाऱ्या 9 संघटनांना ” कृष्णमाई सुपुत्र सामाजिक गौरव पुरस्कार ;
सांगली दि. 3 एप्रिल 2026:
युवराज आदित्यराजे पटवर्धन यांच्या पुढाकारातून कृष्णा नदी स्वच्छता अभियानाचा आज सरकारी घाटावर कृष्णामाईची आरती करून उत्साहात शुभारंभ झाला. नागरिक व विविध सामाजिक संघटनांच्या मोठ्या सहभागामुळे उपक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.
यावेळी नदीसेवेत दीर्घकाळ कार्यरत ९ संघटनांचा “कृष्णामाई सुपुत्र सामाजिक गौरव पुरस्कार” देऊन सन्मान करण्यात आला. गुढीपाडव्याच्या संकल्पांपैकी हा पहिला उपक्रम असून क्रीडा व पर्यटन विकासावरही लवकरच काम होणार असल्याचे पटवर्धन यांनी सांगितले.
ही मोहीम सातत्याने राबवली जाणार असून पुढील स्वच्छता अभियान १२ एप्रिल रोजी विष्णू घाटावर होणार आहे. घाटांवरील मूलभूत सुविधांसाठीही पावले उचलली जाणार असल्याची माहिती देण्यात आली.
पत्रकार : विजय रणभोर, पुणे
