राजापूर तहसील कार्यालय आणि प्रांत कार्यालयातील कर्मचाऱ्यांची मुजोरी ;काही कर्मचाऱ्यांच्या गाड्यांना HSRP नंबर प्लेटच नसल्याचे समोर येत आहे.
राजापूर तहसील कार्यालय आणि प्रांत कार्यालयातील कर्मचाऱ्यांची मुजोरी ;काही कर्मचाऱ्यांच्या गाड्यांना HSRP नंबर प्लेटच नसल्याचे समोर येत आहे.
जि. रत्नागिरी. ता.(राजापूर)दि. 3 एप्रिल 2026:
महाराष्ट्र शासनाने सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट्स बसवणे बंधनकारक केले आहे. यासंबंधीचे नियम न पाळल्यास पाच हजार ते दहा हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो किंवा कायदेशीर कारवाई होऊ शकते. HSRP नंबर प्लेट्स न बसल्यास आर टी ओ विभागाकडून गाडी जप्त सुद्धा केली जाऊ शकते. ज्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाहीत अशा वाहनांचे नूतनीकरण प्रक्रिया सुद्धा अडचणीची ठरू शकते. त्यामुळे शासनाच्या नियमानुसार HSRP नंबर प्लेट्स बसवणे बंधनकारक आहे.
मात्र वाहतूक पोलिस शाखा सर्वसामान्य जनतेच्या गाड्यांवर HSRP नंबर प्लेट्स नसल्या तर कारवाई करत आहे. मात्र राजापूर तालुक्यातील काही शासकीय कर्मचाऱ्यांच्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट्स म्हणजेच HSRP नंबर प्लेट्स नसल्याची बाब समोर येत आहेत. त्यामुळे प्रशासकीय कर्मचाऱ्यांना काही वेगळा नियम आहे की काय असा सवाल सध्या जनतेमधून उपस्थित केला जात आहे.
पत्रकार : विजय रणभोर, पुणे
