अश्विनी भिडे बनल्या BMC च्या पहिल्या महिला आयुक्त!

अश्विनी भिडे बनल्या BMC च्या पहिल्या महिला आयुक्त
मुंबई : १९९५ बॅचच्या IAS अधिकारी अश्विनी भिडे यांची मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्या मावळते आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडून पदभार स्वीकारणार आहेत. BMC च्या सुमारे १५० वर्षांच्या इतिहासात ही पहिलीच महिला आयुक्त ठरत आहेत.
भूषण गगराणी यांचा कार्यकाळ ३१ मार्च २०२६ रोजी संपल्यानंतर ३० मार्च रोजी सामान्य प्रशासन विभागाने भिडे यांच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा केली.
“मेट्रो वूमन” म्हणून ओळख असलेल्या अश्विनी भिडे यांनी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRCL) च्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून मेट्रो-३ प्रकल्प यशस्वीपणे राबवला आहे. यापूर्वी त्यांनी BMC मध्ये अतिरिक्त आयुक्त म्हणूनही काम केले असून, आरे कॉलनीसारख्या संवेदनशील विषयांवर त्यांनी ठोस भूमिका घेतली होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महिलांना उच्च पदांवर संधी देण्याच्या दृष्टीने ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे