अभिमानाची १५० वर्ष..राजापूर नगर परिषदेचा १५० वा वर्धापन दिन उत्साहात साजरा;
अभिमानाची १५० वर्ष..राजापूर नगर परिषदेचा १५० वा वर्धापन दिन उत्साहात साजरा;
राजापूर. दि. 2 एप्रिल 26: राजापूर नगर परिषदेचा १५० वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. सकाळी नऊ वाजता माननीय लोकनियुक्त नगराध्यक्ष ॲड. हुस्नबानू खलीफे यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी सभापती, नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी, कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
यानिमित्ताने शहरातील विविध शाळांच्या माध्यमातून प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी शहराबाबत घोषणा देत शहरात प्रभात फेरी काढली, ज्यामुळे संपूर्ण वातावरणात उत्साहाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले.
तसेच, राजापूर नगर परिषदेने नुकतीच खरेदी केलेल्या व्हॅक्युम गाडीचे उद्घाटन माननीय आरोग्य सभापती तथा नगरसेवक श्री. सुलतान ठाकूर यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले. या गाडीमुळे शहरातील स्वच्छता व्यवस्थेला अधिक बळ मिळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमास नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष जयप्रकाश नार्वेकर, शीतल पटेल, कल्याणी रहाटे, माजी कर्मचारी सुभाष पवार, किशोर जाधव, विलास करंजवकर, तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एकूणच, १५० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमांनी राजापूर शहराच्या विकासाची परंपरा आणि एकात्मतेची भावना अधोरेखित केली.
महिला व बालकल्याण विभागांतर्गत ‘होम मिनिस्टर’ हा विशेष कार्यक्रम मोठ्या उत्साहात राजापूर येथील जवाहर चौकात पार पडला. स्पर्धक व नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
कार्यक्रमाचे उद्घाटन मा. लोकनियुक्त नगराध्यक्ष ॲड. हुस्नबानू खलीफे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी मा.तहसीलदार श्री. विकास गंबरे यांचे स्वागत मा. नगराध्यक्ष यांचे हस्ते करणेत आला, यावेळी मा. मुख्याधिकारी अभिजीत कुंभार, विरोधी गटनेते ॲड. राहुल तांबे, गटनेते ॲड. जमीर खलीफे तसेच महिला व बालकल्याण सभापती श्रीम. शबाना मुल्ला सर्व नगरसेवक, माजी नगरसेवक व कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
नगरपरिषदेच्या १५० वर्षांच्या प्रवासाचा आढावा न. प. कार्यालयीन अधीक्षक श्री. जितेंद्र जाधव यांनी प्रभावीपणे मांडला. मा. नगराध्यक्षांनी नागरिकांना नगरपरिषदेच्या कार्याची माहिती देत “अभिमानाची १५० वर्षे” या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा दिल्या व शहराच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरेचा अभिमान बाळगण्याचे आवाहन केले.
पत्रकार :विजय रणभोर, पुणे
9359280220.
