नेतृत्व, समाजसेवा आणि परिवर्तनाचा सन्मान – महाराष्ट्र गौरव अवॉर्ड्स 2026
नेतृत्व, समाजसेवा आणि परिवर्तनाचा सन्मान – महाराष्ट्र गौरव अवॉर्ड्स 2026

पुणे : राज्यातील विविध क्षेत्रांत
उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा गौरव करण्यासाठी “महाराष्ट्र गौरव अवॉर्ड 2026 या प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा भव्य कार्यक्रम 12 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 6 वाजल्यापासून सेंटोसा रिसॉर्ट येथे पार पडणार आहे.
मानवाधिकार, न्याय आणि सामाजिक क्षेत्रात 25 वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या HRCPA (ह्युमन राइट्स अँड क्राईम प्रोटेक्शन) यांच्या पुढाकारातून या सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे. महाराष्ट्रभरातील बदल घडवणाऱ्या व्यक्ती व संस्थांना या माध्यमातून सन्मानित करण्यात येणार आहे.
या पुरस्कारासाठी सहभाग घेतल्यास नेतृत्वगुण आणि कार्याचा प्रभाव सादर करण्याची संधी मिळणार असून, प्रसिद्धी, ओळख, तसेच प्रभावी व्यक्तींशी नेटवर्किंग करण्याची संधी मिळणार आहे. यासोबतच भविष्यातील सहकार्य आणि नवीन संधींचे दरवाजेही उघडतील.
पुरस्कार विजेत्यांना प्रतिष्ठित ट्रॉफी, मीडिया कव्हरेज आणि शासकीय पातळीवर ओळख मिळणार आहे. इच्छुकांनी त्वरित आपली नोंदणी करावी, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क: 9890253284 / 9500028248
प्रतिनिधी विजय रणभोर

