टाकळीभानच्या संत सावता सोसायटीची. शंभर टक्के कर्जवसुलीची परंपरा कायम
टाकळीभानच्या संत सावता सोसायटीची शंभर टक्के कर्जवसुलीची परंपरा कायम

टाकळीभान प्रतिनिधी: -श्रीरामपूर तालुक्याच्या पुर्व भागातील महत्वाच्या आसलेल्या टाकळीभान येथील श्री संत सावता माळी वि.वि. कार्य. सेवा सोसायटीची संस्थेच्या स्थापनेपासून कर्जाचा १०० टक्के वसूल देण्याची परंपरा गेली १५ वर्षांपासून आहे. माजी आमदार स्व. जयंतराव ससाणे, स्व. भाऊसाहेब दाभाडे, दिवंगत चेअरमन स्व. एकनाथ लोखंडे यांनी घालून दिलेला आदर्श पुढे सुरु ठेवत, संस्थेने यंदाही ३१ मार्च अखेर बँक पातळीवर १०० टक्के वसुल देवून परंपरा कायम राखली.
३१ मार्च रोजी संस्थेच्या सर्व कर्जदार सभासदांनी घेतलेल्या ७४.७१ उचल केलेल्या कर्जाचा संपुर्ण भरणा करुन संस्थेने बँक पातळीवर १०० टक्के वसुल बँकेला दिला. याकामी संस्थेचे शाखाधिकारी भरत क्षिरसागर, लिपिक सुहास भागवत, जयश्री परदेशी, दत्तात्रय सोमासे, कॅशिअर प्राजक्ता राजभोज, संस्थेचे सचिव रामनाथ ब्राम्हणे, विठ्ठल बनकर, रवि शिरसाठ,रघुनाथ शेळके यांचे मोलाचे सहकार्य लाभले. वसुली कामी संस्थेचे चेअरमन बाबासाहेब तनपुरे, व्हा. चेअरमन शिवाजी शिरसाठ, ज्येष्ठ संचालक विलास दाभाडे,बाबासाहेब बनकर, चंद्रकांत लांडगे, प्रकाश दाभाडे, बाबासाहेब लोखंडे, भारत भवार, मोहन रणनवरे आदींनी विषेश परीश्रम घेतले. सर्व सभासदांच्या सहकार्यामुळे १०० टक्के वसुलाची परंपरा कायम राखता आल्याची प्रतिक्रीया यावेळी संचालकांच्या वतीने देण्यात आली. शाखाधिकारी क्षिरसागर यांनी संचालक मंडळाचा सत्कार करुन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
प्रतिनिधी: दिलीप लोखंडे श्रीरामपूर