रायगड जिल्हा परिषद शाळा, बिरवाडी येथे रक्तक्षय तपासणी व उपचार शिबिर संपन्न;
रायगड जिल्हा परिषद शाळा, बिरवाडी येथे रक्तक्षय तपासणी व उपचार शिबिर संपन्न;
महाड, दि. ३१ मार्च — राष्ट्रीय बालरोग संघटना महाराष्ट्र राज्य शाखेच्या ‘गो अनेमिया गो’ या प्रकल्पांतर्गत रायगड जिल्हा बालरोगतज्ञ संघटनेच्या वतीने रायगड जिल्हा परिषद शाळा, बिरवाडी येथे सोमवार दि. ३० मार्च रोजी शालेय विद्यार्थ्यांसाठी रक्तक्षय तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरात डॉ. शेखर दाभाडकर, डॉ. सुनील शेठ, डॉ. अजित पुल्ले व डॉ. आनंद जोगदंड यांनी एकूण ११५ विद्यार्थ्यांची तपासणी केली. त्यापैकी ७६ विद्यार्थ्यांची रक्त तपासणी करण्यात आली. गरजू विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्या, रक्तवाढीच्या गोळ्या तसेच खाऊचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास डॉक्टर्स असोसिएशन महाडचे अध्यक्ष डॉ. नितीन देशमुख, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल काकड तसेच सरपंच श्री. बागडे यांची प्रमुख उपस्थिती होती. मार्गदर्शन सत्रात डॉ. शेखर दाभाडकर यांनी ‘मुलांमधील सकस आहाराचे महत्त्व’ यावर मार्गदर्शन केले, तर डॉ. सुनील शेठ यांनी रक्तक्षयाबाबत उपस्थितांना सविस्तर माहिती दिली.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. मन्सूर लोखंडे (अहमिदीया पॅथ लॅब), श्री. सुधीर सकपाळ (शिक्षण विस्तार अधिकारी), तालुका व प्रा.आ.के. वैद्यकीय अधिकारी, श्री. निलेश मोरे (आरोग्य सहाय्यक), श्री. रामचंद्र शिर्के (मुख्याध्यापक), श्रीमती उज्वला कनोजे (मुख्याध्यापिका), श्री. शंकर गायकवाड (केंद्रप्रमुख) तसेच आशा व अंगणवाडी सेविकांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या उपक्रमाबद्दल पालक व शिक्षकांनी समाधान व्यक्त करत अशा उपक्रमांची गरज अधोरेखित केली.
पत्रकार:विजय रणभोर, पुणे
