महिला आयोग राजकारणापासून दूर ठेवा; रिटायर्ड न्यायाधीश किंवा आयपीएस महिलांचीच नियुक्ती करा – अंजली दमानिया यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
महिला आयोग राजकारणापासून दूर ठेवा; रिटायर्ड न्यायाधीश किंवा आयपीएस महिलांचीच नियुक्ती करा – अंजली दमानिया यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
पुणे | प्रतिनिधी : महिला आयोगाला राजकीयहस्तक्षेपापासून मुक्त ठेवण्यासाठी रिटायर्ड न्यायाधीश किंवा आयपीएस दर्जाच्या अनुभवी महिलांचीच नियुक्ती करावी, अशी ठाम मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे.
महिला आयोगाच्या सदस्यपदांवर राजकीय पार्श्वभूमी असलेल्या किंवा नेत्यांच्या नातेवाईकांच्या नियुक्त्या होत करू नये असे त्या म्हणाल्या “महिला आयोग हा महिलांच्या हक्कांसाठी लढणारा स्वतंत्र आणि सक्षम मंच असायला हवा. तो कोणत्याही राजकीय प्रभावाखाली काम करू नये.” त्यांनी पुढे सांगितले की, न्यायव्यवस्था किंवा आयपीएस दर्जाच्या दीर्घ अनुभव असलेल्या महिलांची नियुक्ती केल्यास आयोगाची कार्यक्षमता आणि विश्वासार्हता दोन्ही वाढतील.
दमानिया यांच्या मते, अशा पारदर्शक आणि गुणवत्ताधारित नियुक्त्यांमुळे पीडित महिलांना अधिक प्रभावीपणे न्याय मिळू शकतो. सध्या राज्य महिला आयोगाच्या काही नियुक्त्यांभोवती निर्माण झालेल्या वादामुळे हा मुद्दा अधिकच संवेदनशील बनला आहे.
दरम्यान, या प्रकरणी तात्काळ निर्णय घ्यावा असे त्यांनी मागणी केली आहे त्यांच्या या भूमिकेमुळे महिला हक्क, पारदर्शकता आणि राजकीय हस्तक्षेप या मुद्द्यांवर राज्यातील राजकीय व सामाजिक वर्तुळात नव्याने चर्चा रंगण्याची चिन्हे दिसत आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे

